*’महाराष्ट्र अचिव्हर्स’ पुरस्काराने न्यूट्रिशन कंसल्टंट मोहिनी अगरवाल सन्मानित*
*पुणे, (प्रतिनिधी) :*
सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे ही काळाची गरज झालेली आहे. त्यासाठी सर्वांगीण व्यायाम व सकस-पूरक आहार कसा असावा, याची शास्त्रशुध्द माहिती देणाऱ्या आणि न्यूट्रिशन कंसल्टंट मोहिनी अगरवाल यांना महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे ‘महाराष्ट्र अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फिटनेस व न्यूट्रिशन क्षेत्रात फिटनेस कोच,पर्सनल ट्रेनर आणि न्यूट्रिशन कंसल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या आहारतज्ज्ञ मोहिनी अगरवाल यांनी ‘फोशो डायट’ द्वारे विविध आजारांना हद्दपार करून लोकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा सुखद अनुभव देत असल्याबद्दल त्यांना ‘महाराष्ट्र अचिव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नयना चोपडे, कामाक्षी बर्वे ,सोनाली खोचरेकर, नंदीता खैरे आदी उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना आहारतज्ज्ञ मोहिनी अगरवाल म्हणाल्या की, सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे ही काळाची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या समस्या मोठ्याप्रमाणावर भेडसावत आहेत. मात्र ‘फोशो डायट’ हा विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना दिलासादायक ठरला आहे. आहाराने आजार बरे करा हे तत्व ‘फोशो डायट’चे असून आजवर अनेकांचे विविध आजार बरे झाले आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली लहान मुलांपासून ते ज्येष्ठांना ‘फोशो डायट’ हा निरोगी जीवनशैलीसाठी आधारवड ठरला आहे. डायट करणे म्हणजे वजन कमी करणे असे नव्हे तर आहाराने आपल्याला निरोगी जीवन जगता येते. वजन कमी करणे अथवा वजन वाढविणे, डायबेटीस, सांधेदुखी, स्नायूंच्या वेदना, थायरॉड, अपचन, त्वचा विकार अशा विविध समस्यांवर ‘फोशो डायट’ प्रभावी
*आहाराने आजार दूर करा हा मूलमंत्र ‘फोशो डायट’चा आहे. त्यासाठी आम्ही मोफत मार्गदर्शनही करतो. ज्यांना या ‘फोशो डायट’ थेरपीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ७०६६५५४६८२ किंवा ८६०५७५०३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच www.fosho.in यावर भेट द्यावी, असे आवाहन आहारतज्ज्ञ मोहिनी अगरवाल यांनी केले आहे.*